घोडेगाव येथे शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक उत्साहात

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोडेगाव येथे स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक व महासत्संग कार्यक्रम हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी घोडेगाव येथे शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. कमानींचा शुभारंभकरण्यात आला. संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वेरूळ येथे २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा होणार आहे.

या सोहळ्यात जपानुष्ठान अभिषेक अखंड नंदादीप नामसकीर्तन श्रमदान हस्तलिखित जप श्री सार्थ एकनाथी पारायण यज्ञ आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तयारीसाठी तालुक्यातील गावोगावी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने तालुक्यातील घोडेगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून गावाच्या फाट्यावर कमानीचे शुभारंभशांतिगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण इंगळे, सरपंच दादासाहेब जाधव, सुजाताई प्रवीण इंगळे, दिलीप आवारे, गणेश आधाने, गणेश जाधव, पांडुरंग जाधव, दिलीप जाधव व पंचक्रोशीतील जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.